श्रीनवनाथांची आरती
मच्छिंद्र गोरख तैसे जालिंदरनाथ। कानिफ गहिनीनाथ नागेशासहित।
चर्पटि भर्तरी रेवण मिळुनी नउनाथ। नवनारायण अवतार संत॥ जय० ॥१॥
भक्तिशक्ति बोधावैराग्यहित। तापत्रय ते हरिती स्मरा एकचित्त।
नमने चरित्र पठणे दुरितांचा अंत। भक्तजनासी तारी नवनाथ खचित॥ जय० ॥२॥
इहपर साधुनि देति समस्त नवनाथ। भूत समंधा प्रेता घालविती सत्य।
भक्तजनांचे पुरवा तुम्हीच संकल्प। कृपार्थ होता दावा सदानंदरूप॥ जय०॥३॥
दुःखी दीन दरिद्री लोकांना तारा। देऊनि सुख संपत्ति मुक्ती दोहि करा।
स्मरण करावे आता नित्य नित्यनाथा। शरणागत मी तुमच्या पायी मम माथा। जय० ॥४॥
नवनाथचि आधार सकलांना आता। आरती ओवाळिता हरली भवचिंता।
ब्रह्म सनातन शांति देई मम चित्ता। शरण विनायक लोटांगण आता॥ जय० ॥५॥
श्रीनवनाथांची आरती - २
मच्छिंद्र, गोरक्षजालिंदरनाथ। कानिफा, चौरंगी, आडबंगीनाथ॥
रेवण, चरपटी, गहिनी, नि वटसिद्ध। भर्तरि आणि मीननाथ ॥१॥
जयदेव जयदेव जय 'नवनाथा'॥ आरती स्वीकारावी प्राज्ञीक-वंता॥धृ०॥
जन्म आपुला 'अयोनि संभव' । त्यांत 'श्रीदत्तात्रेय- अनुग्रह'॥
तेणें प्रसन्न केली दैवतें। संपादिली सर्वविद्या-अस्त्रांतें॥
त्या महान विद्या अस्त्रातें ॥ जय० ॥२॥
केले हो सुखी सकल जनांसी। चौऱ्याऐंशीसिद्ध करूनी।
दत्त पंथाचा हो नाथ पंथाचा हो, वाढविला महिमा॥ जय० ॥३॥
चरणासी एकचि “नम्रविनंती, 'या बाळांवरी' ठेवा कृपादृष्टी"॥
'नवनाथ! नवनाथ!' करिता धावा। तारुनि न्यावे 'या बाळकांना॥ जय० ॥४॥
No comments